
शिरूर : कारेगाव (ता. शिरूर) जवळील बाभूळसर खुर्दच्या शिवेवरील शेततळ्यात पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. २८) रात्री सातच्या सुमारास चौघेजण शेततळ्यात बुडाले होते. मात्र, दोघांना वाचविण्यात स्थानिक तरुणांना यश आले. कृष्णा उमाजी राखे (वय ८) व अनमोल ऊर्फ बाबू प्रवीण पवार (वय १३) अशी मृत मुलांची नावे आहेत.