
Wagholi Tragedy
Sakal
वाघोली : उबाळेनगर परिसरात कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली पोलिसांनी मंडळाचे पदाधिकारी, ट्रॅक्टरचालक तसेच साउंड आणि सजावटीचे स्ट्रक्चर लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे.