mallikarjun ambegave and aarti ambegave
sakal
मंचर - पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळील एकलहरे (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. २२) रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवड येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरासह पिंपरी-चिंचवड आणि लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.