prathmesh tinde, tanmay tupe and tushar shinde
sakal
मांजरी - रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेले तिघेही तरूण अपघात होण्यापूर्वी रेल्वे रूळाजवळून चालत होते. त्यांचे दोन्ही मित्र अलिकडील बाजूला पुलावर बसले होते. त्याचवेळी पुण्याच्या दिशेकडून रेल्वे आली. मात्र, त्या तिघांनाही रेल्वेचा ना मित्रांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि बघता बघता ते रेल्वेच्या जोरदार धडकेत मृत्यूमुखी पडले.