

Fatal Crash in Indapur: One Dead, One Injured After Tempo Hits Bike
esakal
-संतोष आटोळे
इंदापूर : निमगाव केतकी (ता. इंदापूर) हद्दीत व्याहाळी रस्त्यावर भरधाव टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये गणेश सतीश बिबे (वय 20, रा.गौतंडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.