चाकण - चाकण-आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला शुक्रवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील सोहम उल्हास कडुसकर, सूजय दिलीप कडूसकर (दोघेही वय १७, कोरेगाव, ता. खेड) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.