Pickup overturned
sakal
ओतूर - तळेरान, ता. जुन्नर येथील काळूबाई देवीच्या दर्शनावरून परतत असताना शिंदळदरा वळणावर पीकअप दहा फुट खोल उलटी होऊन झालेल्या अपघातात एका महीलेचा मृत्यू झाला. अंदाजे १३ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला असल्याची माहीती ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.