
वाल्हे : रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता.पुरंदर) येथील गणेश बाळासाहेब पवार (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात जुनी जेजुरी-कोळविहिरे मार्गावरील परिसरात शनिवारी (ता. ९) रात्री साडेनऊच्या दरम्यान घडला.