बाभुळगाव खालसा शिवारात अपघातात

बाभुळगाव खालसा शिवारात अपघातात
Published on: 

टुडे एक
अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
मिरजगाव, ता. ८ ः अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावर बाभूळगाव शिवारात शनिवारी (ता. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. सुदाम मारुती पडोळे, देविदास मारुती पडोळे, श्रेया विशाल पडोळे (वय १०, सर्व रा. केळसांगवी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे केळसांगवी (ता. आष्टी) गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश शिवाजी पडोळे (वय ४४, रा. केळसांगवी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या कुटुंबातील सदस्य दुचाकीवरून प्रवास करत असताना बाभूळगावात सुलताना अजिज शेख यांच्या घरासमोर त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास मिरजगाव पोलिस करीत आहेत. या प्रकरणी कारचालक मच्छिंद्र सुभाष कदम (रा. तांबवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पडोळे कुटुंबीयांसह संपूर्ण केळसांगवी गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.