
राहू : दहिटणे (ता. दौंड) येथे आज बुधवारी (ता .३० ) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आई शेजारी झोपलेल्या अकरा महिन्याच्या अन्वित धुळा भिसे (रा. दहिटणे) चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले . तब्बल 31 तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मेंढ्यांच्या वाड्यापासून साधारणता पाचशे फूट अंतरावर उसाच्या क्षेत्रात त्याचे काही अवशेष आढळून आले.