राजगुरुनगर / चाकण/ पाईट : पाईट गावाजवळील कुंडेश्वर घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व महिला सौभाग्यवती होत्या. त्या सर्व जणींनी देवदर्शनाला जाताना पांढऱ्या साड्या परिधान केल्या होत्या. दुर्दैवाने तेच त्यांचे कफन झाले. .पापळवाडी येथील पूनम दादाभाऊ दरेकर यांनी सांगितले की, सर्व अपघातग्रस्त महिला या पापळवाडी येथील काळूबाई बचत गटाच्या सदस्या होत्या. एकमेकांच्या नातेवाईक महिला यामध्ये मृत्युमुखी पडल्या किंवा जखमी झाल्या. त्यामुळे पापळवाडीत आज संध्याकाळी चुलीच पेटल्या नाहीत. सर्वत्र दुःखाचे गडद सावट होते..पाईट येथील राजू किसन शिंदे पाटील या कापड व्यावसायिकाने सांगितले की, पापळवाडीतील या अपघातग्रस्त महिला आठवड्यापूर्वी खूप आनंदात होत्या. कुंडेश्वराला जायचे म्हणून त्या सर्वजणींनी माझ्याच दुकानातून सुमारे ५० पांढऱ्या रंगाच्या पण त्यावर हलके डिझाईन असलेल्या साड्या खरेदी केल्या होत्या. त्यांच्या अपघाताची बातमी पाईटमध्ये समजतात गावातील सर्व दुकाने बंद झाली. पाईटमध्ये सर्वत्र सन्नाटा पसरला. गावावर शोककळा पसरल्याने आम्ही उद्याही बंद पाळणार आहोत..खेड तालुक्यासाठी काळा सोमवारराजगुरुनगरजवळील चांडोली ग्रामीण रुग्णालयात एक दुर्दैवी उच्चांक झाला, पाईट जवळच्या कुंडेश्वर येथील अपघातातील १० मृतदेहांचे आणि भिवेगाव (ता. खेड) येथील धबधब्याखाली बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे शवविच्छेदन करण्याची वेळ ग्रामीण रुग्णालयांच्या डॉक्टरांवर आली. आजपर्यंत चांडोली ग्रामीण रुग्णालयात झालेले ही सर्वात जास्त शवविच्छेदनांची संख्या आहे. खेड तालुक्यासाठी हा सोमवार काळा सोमवार ठरला..पाईट गावाजवळील कुंडेश्वर घाटातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १० महिलांचे शवविच्छेदन राजगुरुनगरजवळील चांडोली ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. तसेच, भिवेगाव येथील धबधब्याखाली बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे शवविच्छेदनही रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केले, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजश्री रानडे यांनी सांगितले. त्यासाठी जादा कटर मागवून घेतले आणि हे काम पार पाडले, असे त्यांनी सांगितले..दुपारी साधारण तीन वाजल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत शवविच्छेदनाचे काम आम्ही पाच-सहा डॉक्टर करत होतो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम चिखलीकर यांनी सांगितले..आईचा मृत्यू, मुलगी जखमीशोभा ज्ञानेश्वर पापळ यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी सिद्धी ज्ञानेश्वर पापळ ही गंभीर जखमी आहे. शारदा रामदास चोरघे ही आई गेली, तर त्यांची मुलगी सिद्धिका रामदास चोरघे जखमी आहे. सुप्रिया दत्तात्रेय लोंढे आणि निशांत दत्तात्रेय लोंढे हे मायलेक जखमी आहेत. जयश्री वनाजी पापळ आणि निकिता वनाजी पापळ या मायलेकी ही जखमी आहेत. सुलोचना मनाजी कोळेकर व ऋतुराज कोतवाल ही आजीनाताची जोडी जखमी आहे.Pankaja Munde: मला पद, जमीन, संपत्ती नको, फक्त वडीलांचं प्रेम आणि शिकवण महत्त्वाची’ : पंकजा मुंडे यांचे मनोगत.मृतांमध्ये नणंद- भावजयीसह सख्ख्या जावांच्या दोन जोड्यापाईटच्या कुंडेश्वर घाटात झालेल्या अपघातात पापळवाडीतील अनेक घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सख्ख्या जावांच्या दोन जोड्या गेल्या; तर एका नणंद भावजयीचा जोडीचा मृतांमध्ये समावेश आहे. एक आई गेली, तर मुलगी गंभीर जखमी आहे. पापळवाडील विलास दरेकरांच्या घरावर काळाची कुऱ्हाडच कोसळली. त्यांच्या दोन सख्ख्या भावजयी, म्हणजेच दोन सख्या जावा संजीवनी कैलास दरेकर व बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर या मृत्युमुखी पडल्या. तसेच, चुलत भावजय मंदाबाई कानिफ दरेकर याही दगावल्या. तर, मृत मंदाबाई यांची भावजय शकुबाई तानाजी चोरघे याही या अपघातात गेल्या. तर विलास यांची पत्नी मनीषा विलास दरेकर ही गंभीर जखमी आहे. सुमन काळूराम पापळ व शोभा ज्ञानेश्वर पापळ या दोघी सख्ख्या जावाही या भीषण अपघातात ठार झाल्या..‘राज्य सरकार अपघातग्रस्त कुटुंबीयांसमवेत’राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार दिली. त्यांनी सांगितले की, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन, पोलिस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. .हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगात शासन मृतांच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री.रक्षाबंधन शेवटचेच नुकताच रक्षाबंधनाचा सण झाला. भावांना बहिणींनी राख्या बांधल्या. परवाचा दिवस आनंदात गेला आणि आज श्रावणी सोमवारनिमित्ताने गावातील महिला जवळच असलेल्या कुंडेश्वरच्या दर्शनासाठी आनंदात निघाल्या होत्या. पण, त्यांना काय माहिती काळ आपल्यावर घाला घालील. महिला आनंदाने पिकअपमध्ये बसल्या होत्या. गप्पागोष्टी रंगल्या होत्या. रस्त्यावरील पहिला चढ आला आणि पिकअप मागे गेला आणि दरीत कोसळला. होत्याचं नव्हतं झालं. अखेरच्या आनंदाचा चेंदामेंदा झाला आणि नात्यांची वीण कायमची सुटली गेली. या अपघातात सख्ख्या जावा, नणंद, भावजया मृत पावल्या आणि बोलणारी नाती कायमची संपली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.