
शिरूर : पुणे - अहिल्यानगर रस्त्यावर शिरूर नजीक सतरा कमानीच्या पूलाजवळ एसटी च्या धडकेत गिरीश धोंडीबा गायकवाड (वय ३५, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या दूचाकीस्वाराचा मृत्यु झाला. मृत गायकवाड हे एका फायनान्स कंपनीच्या शिरूर शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते.