पुणे- मुंबई महामार्गावर ट्रेलर जळल्याचा थरार; चालकाच्या प्रसंगावधान मोठा अपघात टळला

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 17 January 2021

. बघता बघता आगीने उग्र रुप धारण करत ट्रेलरचे केबिन जळून खाक झाले. 

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात जुन्या अमृतांजन पुलाजवळ रविवारी पहाटे ट्रेलरला लागलेल्या आगीत केबिन जळून खाक झाले. सुदैवाने या अपघातात कसलीही जिवीतहानी झाली नाही.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बोरघाटात मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या ट्रेलरच्या (क्र. सीजी-13-डी-7525) च्या इंजिनातून धुर येऊ लागल्याने ट्रेलर चालकाने ट्रेलर प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूला घेतला. मात्र दरम्यान केबिनने पेट घेतला. बघता बघता आगीने उग्र रुप धारण करत ट्रेलरचे केबिन जळून खाक झाले. 

काळी जादू,करणी झाल्याचे सांगत पावने तीन लाख उकळले; एकास अटक

घटनेची माहिती मिळताच आयआरबी कंपनीचे कर्मचारी, देवदूत पथक, आयआरबी पेट्रोलिंग टीम, बोरघाट महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. द्रुतगती मार्गावर पहाटे वाहनांची फारशी वर्दळ नसल्याने घटनेदरम्यान वाहतुकीची कोंडी झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trailer Fire incident on pune mumbai expressway Near By Amrutanjan Bridge