पुणे : प्रवासापूर्वीच प्रवासी थकले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune station passenger

पुणे : प्रवासापूर्वीच प्रवासी थकले!

पुणे - पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांना आता ‘रिग्रेट’ आहे. त्यामुळे प्रवाशाना वेटिंग तिकिटे देखील मिळत नाही. तर दुसरीकडे प्रशासनाने काही मोजक्या गाड्या सोडल्या तर सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्यांची जनरल तिकिटांची विक्री बंद ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी मोठी आडकाठी निर्माण झाली आहे.

कोणी फ्लॅटफॉर्म तिकीट काढून जात आहे तर कुणी विना तिकीटाचा प्रवास करीत आहे. रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या सहा रेल्वेला जनरल तिकीटाची विक्री सुरू केली आहे. मात्र, पुणे स्थानकावरून बहुतांश प्रवासी उत्तर भारतसाठी प्रवास करतात. त्याच प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे मुश्किलीचे बनले आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस तसेच पुणे-कन्याकुमारी जयंती एक्स्प्रेस या मोजक्याच गाड्यांना जनरल तिकिटाची विक्री केली जात आहे.

रिग्रेट म्हणजे काय?

राजकोट एक्स्प्रेस, दानापूर एक्स्प्रेस, गोरखपूर, लखनौ एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस, अजमेर एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस यासह अन्य गाड्यांना रिग्रेट सुरू झाले आहे. रिग्रेट म्हणजे वेटिंगच्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त तिकिटे काढली गेली की रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत ऑटोमॅटिक रिग्रेट सुरू होतो. रेल्वेमध्ये वेटिंगच्या प्रवाशांची संख्या जास्त होऊ नये. अन्यथा याचा त्रास आरक्षित तिकीट धारकांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रशासन तिकीट काढू नये म्हणून रिग्रेटचा वापर करतात.

Web Title: Trains From Pune To North India Are Regrettable

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top