राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

राज्यातील विविध विभागातील भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे : राज्यातील विविध विभागातील भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश सरकारकडून जारी करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जे. मुखर्जी यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी बदली झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव एस. ए. तागडे यांची वस्त्रोद्योग प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी बदली झाली.

Image result for IAS

तर महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी. वेणूगोपाल रेड्डी यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of IAS Officers in Maharashtra