
राजगुरूनगर, ता. १९ : खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर पंढरपूर येथील तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली झाली असून, खेडच्या तहसीलदार म्हणून त्या आता कार्यभार सांभाळतील. महसूल विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी आमले यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यांची आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी या पदावर बदली झाली आहे. शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास ४ फेब्रुवारी २०२० रोजी आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी ५ फेब्रुवारी २०२० रोजी सादर केलेल्या अहवालात, आमले यांच्याबद्दलच्या तक्रारीत तथ्य असल्याने त्यांची बदली केल्याचे आदेशात म्हटले आहे.
गेल्यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीत, दिलीप मोहिते हे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर एक-दोन महिन्यातच त्यांचे आणि तहसीलदार आमले यांचे बिनसले. मी तालुक्याच्या आणि लोकांच्या हिताची कामे सांगतो, ती झाली पाहिजेत, असे मोहिते यांचे म्हणणे होते. तर शासनाचे नियम सोडून मला कुठलेही काम करता येणार नाही, अशी आमले यांची भूमिका होती.
या संघर्षामुळे आमदारांनी आमले यांची बदली करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचेच सरकार असताना आमदारांच्या मागणीला मंत्रालय पातळीवर मंत्री व अधिकारी दाद देईनासे झाले. त्यामुळे आमदार चिडले आणि त्यांनी गौण खनिजामध्ये भ्रष्टाचार करीत असल्याचे आरोप करीत, तहसीलदारांच्या बदलीची उघड मागणी सुरू केली. तरीही त्यांचे दबावतंत्र अपुरे पडल्याने ते अधिकच खवळले आणि त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या आणि सरकारच्या विरोधातच उघडपणे भूमिका घेतली. मंत्री हे फक्त त्यांच्या त्यांच्या मतदारसंघ पुरते मर्यादित असल्याची टीका त्यांनी केली. खेड तालुक्याला न्याय न मिळाल्यास वेगळी भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. एवढेच काय, आमले यांच्या कथित गुंड असलेल्या पतीकडून आपल्याला अप्रत्यक्षपणे धमकावले जात असून आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रारही त्यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.