esakal | नऊ झोपडपट्ट्यांचे पालटणार रूप

बोलून बातमी शोधा

Slum

शहरातील नऊ झोपडपट्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कामाला सुरुवात केली आहे. या सर्व झोपडपट्यांमध्ये ४९२५ घरांचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) योजनेअंतर्गत विकास करण्यात येणार आहे, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव सुरेश जाधव यांनी सांगितले.

नऊ झोपडपट्ट्यांचे पालटणार रूप
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे पुनर्विकासाला सुरुवात; ४९२५ घरांचा समावेश
पिंपरी - शहरातील नऊ झोपडपट्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कामाला सुरुवात केली आहे. या सर्व झोपडपट्यांमध्ये ४९२५ घरांचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) योजनेअंतर्गत विकास करण्यात येणार आहे, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव सुरेश जाधव यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे, त्यातील तीन ते चार ठिकाणी पात्रता यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्राधिकरणाकडून झोपडपट्टी असणाऱ्या ठिकाणाचे ड्रोनद्‌वारे छायाचित्र काढण्यात येत आहेत. संबंधित जागेचा नकाशा, सर्वे क्रमांक, झोपडीधारकाचे नाव, ते केव्हापासून तेथे राहतात याची माहिती क्‍यूआर कोड आधारे घेण्याचे काम सुरू आहे. चार ठिकाणचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे दाखल झाले आहेत.

...अन् लोकांनी ती कार उचलून रस्त्यावर ठेवली

निगडीमधील शरदनगर भागातील सर्व्हे क्रमांक ५६/५७/६३/६४, भोसरी कासारवाडी परिसरातील सर्व्हे क्रमांक ५०० येथे बांधकाम नकाशांना मंजुरी दिली आहे. नऊ ठिकाणी राबवण्यात येणारी ही योजना टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

फुरसुंगीत बिबट्याचा थरार; गोठ्यातील वासरला फाडून खाल्ले

सोसायटी स्थापन करा
ज्यांचे एसआरए योजना करण्याचे निश्‍चित केले नाही, त्यांना सोसायटी स्थापन करता येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक पूर्ततेसाठी प्राधिकरणात सहकार निबंधकांची नियुक्‍ती केली. सोसायटीची स्थापना झाल्यावर एसआरए योजना राबविण्यासाठी रहिवाशांच्या संमतीने विकसकाची नेमणूक करता येणार आहे.