
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: अनेक दिवसांपासून उरुळी कांचनसह परिसरात विद्युत रोहित्र चोरीच्या घटना घडत होत्या. मंगळवारी (ता. ११) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन चोर हे विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तीन पैकी एका चोराला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. दिनेश सिन्ह (वय अंदाजे ४७) असे त्यापैकी एकाचे नाव आहे.