

Legal Notice Department Closed, AQI Data Unavailable in Pune Region
sakal
पुणे: एकीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेत दरवर्षी हजारो टन सिमेंटची विषारी धूळ मिसळत आहे, तर दुसरीकडे मुळा-मुठा नदीत राजरोसपणे विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जात आहे. मात्र, कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ‘तांत्रिक अडचणींचे’ कारण पुढे करत आपल्या कारभारावर अपारदर्शकतेचा पडदा टाकला आहे. ‘एमपीसीबी’च्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘लीगल नोटीस’ विभाग ऑगस्ट २०२५ पासून बंद असून, दररोज प्रसिद्ध होणे बंधनकारक असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) ही उपलब्ध नाही.