
कात्रज - कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हे वाहतूक वळविण्याच्या नियोजनाअभावी रखडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने वाहतुक वळविण्याच्या दोन चाचण्यातील त्रुटी बाबत अभ्यास सुरू आहे. कळीचा मुद्दा ठरत असलेले पीएमपीएल प्रशासन गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.