कोंढव्यात शुभेच्छा कमानीमुळे वाहतूकीला अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Welcome Gate

नवरात्रोत्सव सुरु असल्याने अनेक ठिकाणी कमानी लावत त्यावर फ्लेक्सबाजी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

कोंढव्यात शुभेच्छा कमानीमुळे वाहतूकीला अडथळा

कोंढवा - नवरात्रोत्सव सुरु असल्याने अनेक ठिकाणी कमानी लावत त्यावर फ्लेक्सबाजी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या कमानी कोंढवा परिसरात लावण्यात आल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी तर या कमानी ऐन सिग्नलच्या जागी लावल्याने रस्ते अरुंद झाले असून त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.

आजी माजी लोकप्रतिनीधी, इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणांवर अशा कमानी लावण्यात आल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना स्थानिक नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. परिसरात मोठ्या प्रमाणांत वाहतूक कोंडी होत असताना अशा प्रकारच्या परवानग्या प्रशासन कसे काय देऊ शकते? असा प्रश्न करत वाहनचालक आणि नागरिकांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही फ्लेक्सबाजी आजी-माजी लोकप्रतिनीधींनी केली असल्याने प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

अशा कमांनीवर पाहणी करुन कारवाई करण्यात येईल. अशा कमानी उभारून करण्यात आलेल्या फ्लेक्सबाजीमुळे वाहतूक कोंडी होत असेल तर त्याठिकणी कारवाई करुन ते तात्काळ हटविण्यात येतील - शाम तारू, सहायक आयुक्त, वानवडी क्षेत्रिय कार्यालय

वाहतूक पोलिसही अशा प्रकारच्या कमानी उभारण्यामुळे हतबल झाले आहेत. अतिक्रमणे आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडी होत असताना अशा प्रकारचे उद्योग करण्यात येतात. आम्ही याबाबत महापालिकेला कळविले आहे. त्यांच्याकडून यावर तत्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे - राजेंद्र शेळके, पोलिस निरिक्षक, कोंढवा, वाहतूक विभाग

अशा प्रकारच्या कमानी उभारल्याने परिसरात मोठ्या प्रमाणांत वाहतूक कोंडी होते. याचा स्थानिकांना त्रास होत असून याकडे महापालिकेचे सर्सास दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने अशा वाहतूककोंडी होणाऱ्या अवैध गोष्टींवर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

- नदीम शेख, स्थानिक नागरिक

टॅग्स :puneKondhwaTransport