
पुणे : वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवार्इ होत असल्याचा आरोप, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मालवाहतूक वाहनांना प्रवेशबंदी आणि शहरातील बाजारपेठांमध्ये मालवाहतुकीवर असलेल्या निर्बंधांविरोधात सोमवारी (ता. १) मध्यरात्रीपासून माल वाहतूक करणाऱ्या वाहन संघटनांकडून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. ट्रक, टेम्पो, टँकर व कंटेनर वाहनधारकांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.