esakal | सन १९०० पूर्वीची दुर्मीळ २४ पुस्तके व एक हस्तलिखित साहित्याचा खजिना ऑनलाइन

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगर (ता. खेड) - सार्वजनिक वाचनालयाने डिजिटायझेशन करून इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेली काही दुर्मीळ पुस्तके.

राजगुरुनगर येथील राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालयाने सन १९०० पूर्वीची दुर्मीळ २४ पुस्तके व एक हस्तलिखित यांच्या एकूण ६३०० पानांचे डिजिटायझेशन करून हा अमूल्य व वैभवशाली ठेवा इंटरनेटवर उपलब्ध करून दिला आहे.

सन १९०० पूर्वीची दुर्मीळ २४ पुस्तके व एक हस्तलिखित साहित्याचा खजिना ऑनलाइन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर - येथील राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालयाने सन १९०० पूर्वीची दुर्मीळ २४ पुस्तके व एक हस्तलिखित यांच्या एकूण ६३०० पानांचे डिजिटायझेशन करून हा अमूल्य व वैभवशाली ठेवा इंटरनेटवर उपलब्ध करून दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘१८६२ मध्ये काही पोथ्या व पुस्तकांच्या भांडवलावर येथील समाज धुरंधरांनी ‘जनरल नेटिव्ह लायब्ररी, खेड’ नावाने स्थापन केली. पुढे वाचनालयाने सर्व पुस्तकांचे जतनही केले. त्यापैकी १८३२ ते १९०० पर्यंतचा हा ठेवा आहे. यामध्ये ‘देशी हुन्नर’, ‘विधवा विवाह’, ‘भारतीय ज्योतिःशास्त्र’, ‘प्रमाणशास्त्र’, ‘केरळ कोकीळ’ आदी  ग्रंथांचा समावेश आहे. 

पुण्यातील 68 वर्षीय आजोबांना नडला डेटिंगचा मोह!

ग्रामीण भागातील युवतींकडून काम          
हा प्रयोग राज्य सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहयोगातून पूर्ण केल्याचे संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी सांगितले. पुस्तके स्कॅनिंग विकी प्रकल्पात अपलोड करणे आणि ओसीआर प्रक्रिया करून युनिकोडमध्ये रूपांतर करण्याचे काम ग्रामीण भागातील युवतींनी पूर्ण केले, असे पाबळ येथील विज्ञान आश्रम संस्थेचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil