esakal | ग्रामीण भागातही वाढतोय सायकलींचा ट्रेंड
sakal

बोलून बातमी शोधा

The trend of bicycle is also growing in rural areas

दरवर्षी ग्रामीण भागात शाळा सुरू होत असताना शाळेत जाण्यासाठी सायकल खरेदी पालकांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरोना संकटाच्या काळात आज शाळेत अल्प विद्यार्थी उपस्थित असतानाही मात्र अचानक सायकलीची मागणी वाढू लागली आहे.

ग्रामीण भागातही वाढतोय सायकलींचा ट्रेंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रांजणगाव सांडस (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व आजही प्रतिकारक्षमता व  श्वसन क्षमतेबाबत निर्माण झालेल्या जागृतीमुळे युवकांसह, व्यवसायिक, डॉक्टर, अभियंते व विविध क्षेत्रातील मंडळींनी सायकलिंग व्यायामाला ग्रामीण भागातही पसंती दिली जात आहे. गुलाबी थंडीतही हा व्यायामाचा फंडा सर्वांनाच आवडू लागला आहे. परिणामी सायकल व्यायामाचा ट्रेन अधिक वाढला असून ग्रामीण भागातही पूर्वीप्रमाणे सायकल सुरू झाल्याचे दिसत आहे.          

दरवर्षी ग्रामीण भागात शाळा सुरू होत असताना शाळेत जाण्यासाठी सायकल खरेदी पालकांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरोना संकटाच्या काळात आज शाळेत अल्प विद्यार्थी उपस्थित असतानाही मात्र अचानक सायकलीची मागणी वाढू लागली आहे.

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

जागतिक आरोग्य संघटना व केंद्राच्या, राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने सायकलिंग मुळे भक्कम होणाऱ्या श्वसन क्षमतेच्या संदर्भाने सर्वसामान्यांचे लक्ष वेधले. कोरोनाचा हा आजार श्वसन यंत्रणेशी निगडित असल्याने सायकलिंग बाबत ग्रामीण भागातही जागृतता आली. इतर व्यायामाच्या प्रकारामुळे केवळ स्नायू बळकट होणे एवढेच होते. पण श्वसनाची श्रमता वाढती ठेवण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून वापरला जाऊ लागला आहे. ग्रामीण भागातही सायकल राईड करण्याची संख्या वाढली आहे. अनेक उच्चशिक्षित वर्ग लॉकडाऊन च्या काळात आपल्या गावाकडे आल्याने तो सायकलींचा वापर करू लागला त्या काळात त्यांचे अनुकरण इतर  जन आजही करताना दिसत आहे.

श्वसनासाठी उत्तम व्यायाम प्रकार म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले आहे. बच्चेकंपनीसह, ज्येष्ठ, विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित व इतर मंडळी सायकलिंग चालवण्याचे दृश्य ग्रामीण भागातही दिसते. ग्रामीण भागातही बऱ्याच जणांच्या सायकल गिअर नॉनगिअरच्या आहेत. अनेक जण न चुकता दररोज व  काहीजण वेळ मिळेल तेव्हा सायकल स्वारी करीत आहेत. वजन कमी करण्याची धडपड, कॅलरीज काउंटिंगच्या माध्यमातून स्वतःही ऊर्जा वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागातही अनेक उच्चशिक्षित त्यांना सायकलींसाठी हातात हेल्प ब्रँण्ड वॉचहीखरेदी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे किलोमीटर व बन कॅलरीज त्वरित समजण्यात मदत होत आहे .   

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

''सायकलिंगचा व्यायाम करणार्‍या लोकांची संख्या ग्रामीण भागातही आजच्या गुलाबी थंडीत दुपटीपेक्षा अधिक झाल्याचे दिसते. कोरोनाच्या काळापासून मी  दररोज सायकलिंग करतो आठवड्यातून एक दिवस जसा वेळ मिळेल तसा अधिक सायकलिंग चालवतो त्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली.''
- चेतन लोखंडे -युवक रांजणगाव सांडस ता. शिरूर         

''शालेय जीवनानंतर कोरोनाच्या संकट काळापासून सायकलींची आवड वाढीस लागली आहे. सायकलिंग मुळे हृदयाच्या रक्तशुद्धी करण व ऑक्सिजनेटीगच्या क्षमता वाढतात. त्यामुळे हा व्यायामाचा प्रकार निश्चित उपयुक्त ठरतो.  युरोपीय देशाप्रमाणे  सायकलिंग नियमित वापरल्यास  प्रदूषण नियंत्रणात मदत होईल.''
 -डॉ.संदीप कोकरे -अध्यक्ष शिरूर तालुका डॉक्टर असोसिएशन   

loading image
go to top