अभ्यास करायचा की नेटवर्क शोधायचं? रेंजसाठी विद्यार्थ्यांची भटकंती 

पराग जगताप
Friday, 14 August 2020

आदिवासी गावांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क असेल ते ठिकाण शोधून त्या ठिकाणी छत्री किंवा इतर सांधनांचा आधार घेऊन भर पावसात उभे राहून अभ्यास करावा लागत आहे. 

ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्‍याच्या आदिवासी भागातील माळशेज पट्ट्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोबाईलला नेटवर्क (रेंज) मिळत नाही. करंजाळे, खुबी व माळशेज पट्ट्यामधील इतर आदिवासी गावांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क असेल ते ठिकाण शोधून त्या ठिकाणी छत्री किंवा इतर सांधनांचा आधार घेऊन भर पावसात उभे राहून अभ्यास करावा लागत आहे. 

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

सध्या कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने अभ्यास सुरू आहे. मात्र, मुलांसह पालकांनी ही डोंगरभागात नेटवर्क शोधत फिरावे लागत आहे. या भागात त्वरित नेटवर्क उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करंजाळे येथील नंदकिशोर जगताप, सुभाष जगताप, विक्रम चव्हाण, रभाजी साळवे, शिवाजी जगताप, ताराचंद जगताप, रंजन शिंदे, अरुण शिंदे, पुष्कर पवार, खंडू जगताप, ओम्‌कार जगताप, विकी जगताप, विशाल पवार, अमोल पवार, दत्ता पवार, मच्छिंद्र जगताप, विलास पवार, भरत पवार, उत्तम राक्षे यांनी केली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार कोल्हे यांना निवेदन, पण... 
खुबी, करंजाळे व माळशेज पट्ट्यात मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे म्हणून जून महिन्यात शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याबाबत त्यांच्याकडून फक्त फोनवर आश्वासन मिळाले आहे. मात्र अजूनही याबाबत कोणतेही ठोस कारवाई झालेली नाही, असे मनसेचे जुन्नर तालुका पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष नंदकिशोर जगताप यांनी सांगितले. 

या भागातील नेटवर्कचा प्रश्नाची त्वरित मार्गी लावून आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेकडून आदिवासी जनतेला सोबत घेऊन मनसे स्टाइलने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. 
- नंदकिशोर जगताप, अध्यक्ष, मनसे जुन्नर तालुका पश्‍चिम विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the tribal areas of Junnar taluka Obstacles to online study due to lack of mobile network