Ashok Uike : माझं शिक्षण मराठीचं! हिंदी नाही येत... मंत्री उईकेंची स्पष्ट भूमिका
Marathi Language : आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी हिंदी न येत असल्याने पत्रकारांशी मराठीतच संवाद साधला. मराठीचे संस्कार आईने दिल्यामुळे तीच माझी भाषा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पुणे : ‘‘माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला. आई अशिक्षित होती. तिने माझ्यावर मराठीचे संस्कार केले, म्हणून मला तीच भाषा येते. हिंदीला विरोध नाही; मात्र मला हिंदी येत नाही, मी मराठीच बोलतो,’’ असा पवित्रा आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी घेतला.