

घोडेगाव (ता आंबेगाव ) येथील पंचायत समिती कार्यालयात निवेदन देताना किसान सभेचे कार्यकर्ते.
Sakal
घोडेगाव : आदिवासी विकासात पेसा कायद्याचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. या कायद्याच्या अंबलबजावणी साठी पेसा ग्रामसभा मोबिलायझर ची भुमिका महत्वाची आहे.
मात्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार तीन ग्रामपंचायतींना यापुढे एकच पेसा ग्रामसभा मोबिलायझर असणार आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा व अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. या मागणीचे निवेदन किसान सभा व आंबेगाव तालुक्यातील सर्व पेसा ग्रामसभा मोबिलायझर यांनी पंचायत समिती आंबेगाव च्या गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांना दिले.