आदिवासींचा मोर्चा मुंबईला नेऊ

आदिवासींचा मोर्चा मुंबईला नेऊ
Published on

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात गेल्या १२ दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेले उपोषण स्थगित करून युवकांनी आंदोलन चालू ठेवावे. या आंदोलनाची व्याप्ती राज्यभरात वाढवून आपण दिल्लीतील जंतरमंतर प्रमाणे सकल आदिवासींचा मोर्चा थेट मुंबईला घेऊन जावू आणि आदिवासी विकास मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडू, असा इशारा देत कॉक्रोज जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी गुरूवारी आदिवासी युवकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (यूबीटी) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ ‘सीजेपी’चे संस्थापक दिपके यांनी आदिवासी उपोषणकर्ते व आंदोलकांची भेट घेतली. आज दुपारी दीडला ठाकरेंनी येथे भेट दिल्यानंतर अवघ्या पाच तासांनी दिपके इदगाह मैदानावर दाखल झाले. दिपके यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. गेल्या दोन वर्षात ५९० विद्यार्थ्यांचा वसतिगृहात मृत्यू झाला. त्याची चौकशी व्हायला हवी. मंत्री उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले आणि हसत-हसत गाडीत बसून निघून गेले. तुमच्या मुलीला सर्पदंश झाला असता तर तुम्ही असेच हसत गेला असता का? असा प्रश्‍न दिपकेंनी उपस्थित केला.
उपोषण करून आपला जीव देण्यापेक्षा आपल्या अधिकारांसाठी दिल्लीतील जंतर मंतरप्रमाणे मुंबईत आंदोलन उभे करु. आदिवासींचे आंदोलन हे तुमच्या नेतृत्वात होईल, असे नियोजन करा. त्याला आम्ही पाठिंबा देवू आणि आपण सोबतच मुंबईत जावून आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.

आश्रमशाळांना भेटी देणार
राज्यातील जिल्हा परिषद शाळांची पोलखोल केल्यानंतर अभिजित दिपके यांनी आपला मोर्चा आता आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांकडे वळविला आहे. या शाळांना अचानक भेटी देऊन त्यांची पोलखोल करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tribal Students’ Major Demands Accepted by Maharashtra Government
Amravati Tribal Students Foot March To Yavatmal Government Warned As Protest Intensifies Over Pending Demands
Nashik Tribal Women Protest
tribal youth protest outside commissionerate Nashik
Marathi News Esakal
www.esakal.com