

फुलवडे, ता. १९ : तेरुंगण (ता. आंबेगाव) येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेस जंगलाचा वेढा नाही. शेजारी दाट झाडी नसून शाळेला अंशतः संरक्षक भिंत असल्याने शाळेचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण होते.
निवासी विद्यार्थी
मुले......१२७
मुली......१३४
येऊन जाऊन.....५२
विनासवलत....१
आश्रमशाळेची स्थापना १९७२ ची असून नवीन इमारत सन २०१४ मध्ये बांधण्यात आली. ही आश्रमशाळा सर्व सुखसोयींनी युक्त आहे. शाळेत एकूण ३१४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह
- मुलामुलींना झोपण्यासाठी बंक बेडची सुविधा
- मुलांकडे एक पुरुष कर्मचारी पहारेकरी
- मुलींकडे एक महिला कर्मचारी पहारेकरी
- दोन्ही कर्मचारी दररोज रात्री मुक्कामी असतात.
- वैद्यकीय उपचारासाठी परिचारिका (नर्स) पूर्णवेळ उपलब्ध
सोयी-सुविधांबाबत आश्रमशाळेत कोणतीच अडचण नसून आमच्या मुलांची चांगली काळजी घेतली जाते, नाष्टा व जेवण वेळच्या वेळी देत असून आंघोळीसाठी गरम पाणी देण्यात येते.
- सोपान राजाराम केवळ (पालक)
मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असून येथे स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य व शैक्षणिक वातावरणाचा विचार करून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे सक्रिय असून आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध आहे.
- रोशनी श्यामराव पवार, अधीक्षिका
शाळेभोवती नवीन संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. परिसर स्वच्छता, परिसरात ३२ सीसीटिव्ही यंत्रणा सक्रिय असून रात्रीच्या वेळेस आवारात पुरेशी विजेची व्यवस्था, पोषण आहार तसेच आजारी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाते. गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.
- अभिमन्यू भुजबळ, मुख्याध्यापक
05512