अडाणी हाय ओ...पेपर कशाचा माहित, पण त्या पेपरानी लेकरांच्या तोंडात सणासुदीला सुखाचा खास दिलाय!

मदतीचा ओघ पाहून खडकवासला येथील आदिवासी महिला भाऊक
tribal woman fulabai pawar from Khadakwasla share her words of help from sakal
tribal woman fulabai pawar from Khadakwasla share her words of help from sakal
Updated on

सिंहगड: "मावशी तुमची 'सकाळ' पेपरला बातमी आली होती. ती आम्ही वाचली आणि तुम्हाला मदत घेऊन आलोय", असे तुकाराम मुळीक आदिवासी महिलेला म्हटले. "आम्ही अडाणी हाय.... पेपरबीपर कसला माहित आम्हाला... पण त्या पेपरामुळं आमच्या लेकरांना आणि आमाला या दिवाळीत सुखाचा घास मिळालाय" , असे सांगताना फुलाबाई पवार या आदिवासी महिलेने पदराने डोळे पुसले.

दै. 'सकाळ' मधून खडकवासला येथील आदिवासी कातकरी समाजाच्या व्यथा मांडणारी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून अनेक दानशूर व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. दूरवरून लोक मदत घेऊन येत असून आदिवासींशी त्यांच्या अडचणींबाबत संवादही साधत आहेत. तसेच प्रशासनानेही या आदिवासींना हक्काची मदत देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पैसै नसल्याने आम्ही कधी दिवाळी करत नाहीत असे म्हणणाऱ्या आदिवासींच्या झोपडीत यावर्षी मात्र आनंद संचारला आहे. शिळ्या भाकरीचे तुकडे हातात घेऊन खाणाऱ्या चिमुकल्यांच्या हातात कधी नव्हे ती मिठाई मिळाली आहे!

भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या माध्यमातून त्यांचे वडील तुकाराम मुळीक, अमृत म्हस्के, चंद्रकांत चांदेरे व फ्रान्सिस भोसले यांनी मोठ्या प्रमाणात दिवाळीचा फराळ दिला आहे. भाजपा भोर तालुकाध्यक्ष सचिन मांडके, पुणे शहर उपाध्यक्ष निहल घोडके, 'सकाळ' चे भोर तालुका प्रतिनिधी विजयराव जाधव, भाजपा पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेल संपर्कप्रमुख पंकज खुर्द, विक्रम सुतार ,प्रदीप कामथे, सुनील पायगुडे, प्रल्हाद चौधरी यांनी एक महिना पुरेल एवढा किराणा,फटाके, मिठाई असे पूर्ण सोळा किट आणले तर किरकटवाडी येथील दिपक राजपूत, सागर हगवणे, निलेश गायकवाड, माऊली जाधव, शुभम मते, प्रताप निंबाळकर यांनी दैनंदिन उपयोगाच्या भांड्यांचा संच दिला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी कुटुंबांमध्ये या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या मदतीमुळे समाधान दिसून येत आहे. दुसऱ्यांच्या फटाक्यांचा आवाज ऐकून समाधान मानणारे चिमुकले आता त्यांना मिळालेले फटाके वाजवण्याचा आनंद घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com