esakal | आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख
sakal

बोलून बातमी शोधा

kodhare

गावाच्या परिसरात दोन किलोमीटर अंतरावर पंचायत समितीमार्फत शिवकालीन खडकातील टाकीचे काम करण्यात आले होते. परंतु, इतक्या दुरवरून डोक्यावर पाणी आणणे महिलांना शक्य होत नव्हते. 

आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागातील कोंढरे या गावाला दरवर्षी एप्रिल ते जून या काळात पाण्याची टंचाई भासत होती. परंतु, या वर्षी सुधींद्रनाथ चटर्जी यांच्या आर्थिक मदतीने व ग्रामऊर्जा कंपनी यांच्या सहकार्याने गाव टॅंकरमुक्त झाले असल्याचे शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांनी सांगितले. 

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढरे या गावामध्ये 45 ते 50 कुटुंब राहात आहे. दरवर्षी या गावास एप्रिल ते जून या काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊन शासनाच्या वतीने गावाला टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. गावाच्या परिसरात दोन किलोमीटर अंतरावर पंचायत समितीमार्फत शिवकालीन खडकातील टाकीचे काम करण्यात आले होते. परंतु, इतक्या दुरवरून डोक्यावर पाणी आणणे महिलांना शक्य होत नव्हते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत ग्रामस्थांनी शाश्वत संस्थेचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार त्यांनी ग्रामऊर्जा कंपनीतील प्रसाद कुलकर्णी, किरण औटी व स्वप्नील जाधव यांच्याशी संपर्क साधून सौरऊर्जेतून कोंढरे गावासाठी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्याप्रमाणे ग्रामऊर्जा कंपनी सहकार्य करण्यास तयार झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुधींद्रनाथ चटर्जी यांनी या प्रकल्पाकरिता आर्थिक मदत केली व ग्रामऊर्जा कंपनीने सौरपॅनलसह सर्व कामे पूर्ण केली. गावक-यांनी श्रमदानातून पाईप लाईन खोदण्याचे व इतर कामात देखील मोलाचे सहकार्य करून शिवकालीन टाकी ते गावापर्यंत सुमारे दोन किलोमीटर पाईपलाइन पूर्ण करून गावात पाच ठिकाणी नळ योजना सुरू केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधाजी असवले, रवी असवले, मधुकर शेळके, विकास असवले, सिताराम लांडे, बेबीताई असवले यांच्यासह ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करून गावचा पाणी प्रश्न सोडविला. कोंढरेगाव टॅकरमुक्त झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामऊर्जा कंपनी व सुधींद्रनाथ चटर्जी यांचे आभार मानले.
 

loading image
go to top