Pune : मराठा युद्ध स्मारकात हुतात्मांना मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

मराठा युद्ध स्मारकात हुतात्मांना मानवंदना

पुणे : शौर्य, बलिदान व त्यागाचे प्रतीक असलेल्या मराठा युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) येथे लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रज्वलनातून हुतात्मा जवानांना मानवंदना देण्यात आली. दिव्यांच्या सुवर्ण प्रकाशातून हुतात्मांचे बलिदान पुन्हा एकदा तेजोमय झाले आणि त्यांच्या स्मरणाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

हुतात्मांना मानवंदना देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कॅम्प येथील मराठा युद्ध स्मारक येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक राजाभाऊ चव्हाण, शिवाजी शिंदे, निखिल टेकवडे, विजय महाडीक, राजेंद्र म्हस्के, अक्षय चव्हाण, कुमार शिंदे, ऋषिकेश पवार आदी या वेळीउपस्थित होते.

मराठा युद्ध स्मारकाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. पहिल्या जागतिक महायुद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या गौरवशाली स्मारकाची पायाभरणी प्रिन्स ऑफ वेल्स युवराज एडवर्ड यांच्या हस्ते व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत १९ नोव्हेंबर १९२१ रोजी झाली. स्मारकाच्या शताब्दी वर्षानिमित्त या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

loading image
go to top