German Bakery : 'ती' भयानक संध्याकाळ विसरणे पुणेकरांना अशक्यच!

tribute to victims of german bakery bomb blast after 10 years
tribute to victims of german bakery bomb blast after 10 years
Updated on

पुणे : पुणेकरांच्या मनात जर्मन बेकरी हल्लाच्या आठवणी आजही आहेत. ती संध्याकाळ खूपचं भयानक होती. 13 फेब्रुवारी 2010 ची संध्याकाळची वेळ. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असणाऱ्या जर्मन बेकरी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवादी हल्ल्याला बळी पडली. क्षणात सारं काही कोसळून पडलं. बेकरीत बसलेले देश विदेशातील एकुण 17 नागरिक स्फोटात मारले गेले आणि 60 नागरिक जखमी झाले. त्या क्षणार्धात काय घडलं काहीचं कळालं नाही, असं स्फोटात जखमी झालेले सांगतयेत.  पण, आज 10 वर्षांनंतर जर्मन बेकरी पुन्हा उभी राहिली आहे.

''वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही म्हणतात अगदी तसंच तुलसियानी  कुटुंबा सोबत घडलं. त्यांचा ऐन 24 वर्षाचा तरुण इंजिनिअरिंग पुर्ण झाल्यावर मित्रांसोबत बेकरीत कॉफी घेत होता, मात्र, शरीराचे तुकडेही सापडू नये अशा स्फोटात तो आपलं सर्वकाही गमावून बसला. दहा वर्ष झालं तो अजूनही आमच्यातचं आहे'', अशी त्याची आई मधू तूलसियानी यांनी सांगितले.

 जर्मन बेकरीच्या हल्ल्याप्रकरणी हिमायत बेग, यासिन भटकळ, डेव्हीड कोलमन यांना अटकही झाली मात्र, पुणे न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा रद्द ठरवतं त्यांना जन्मठेप झाली. अजूनही या हल्ल्यातील चार दहशतवादी फरार आहेत. मात्र या हल्ल्याने शांत असणारं पुणे 2010 साली अशांत केलं. या हल्ल्यातून पुणे आणि जर्मन बेकरी आता सावरलीये आणि नव्या जोमानं सुरुही आE

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com