
पुणे : पुण्यातील नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मुलीला प्रवेश मिळावा, म्हणून पालक अरुण काळे (नाव बदलले आहे) यांनी संबंधित महाविद्यालय गाठले. व्यवस्थापन कोट्याद्वारे प्रवेशासाठी आतापासून नावे लिहून घेतली जात असल्याने काळे यांनी देखील आपल्या मुलीचे नाव नोंदवहीमध्ये नोंदविले. दरम्यान, संबंधित महाविद्यालयाने थेट महाविद्यालयाच्या शुल्काच्या तिप्पट शुल्क मागितले. हवालदिल झालेल्या काळे यांनी पुन्हा गावाकडचा रस्ता धरला.