पुणे-सोलापूर रोडवर ट्रकचा अपघात,वाहतूक खोळंबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Truck accident on Pune-Solapur road Traffic jam

पुणे-सोलापूर रोडवर ट्रकचा अपघात,वाहतूक खोळंबली

पुणे : मुंबईवरून लातूरला निघालेला ट्रक पुणे-सोलापूर रोडवर रामटेकडी येथे सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान बस स्टॉपच्या कठड्याला धडकून पलटी झाला. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.(Truck accident on Pune-Solapur road Traffic jam)

पुणे-सोलापूर रोडवर रामटेकडी येथे बस स्टॉपच्या कठड्याला धडकून ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. अनेक वेळा नागरिकांनी व वाहतूक पोलिसांनी तक्रार करून देखील हा कठडा येथून हटविण्यात आला नाही. गेल्या आठवड्यातच टेम्पो ट्रॅव्हलरची धडक बसून टेम्पो ट्रॅव्हलरचे देखील मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान, आज ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे पुणे-सोलापूर रोडवर रामटेकडी ते काळुबाई चौक येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे .वाहतूक कोंडी कमी करण्याचे काम वाहतूक पोलिस करीत आहे.