Pune News : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे मातीने भरलेल्या डंपरला आग

अग्निशमन दलाच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणण्यात यश; डंपरचे नुकसान मात्र जीवितहानी नाही
truck caught fire Kirkatwadi on Sinhagad road pune
truck caught fire Kirkatwadi on Sinhagad road punesakal

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे मातीने भरलेल्या मोठ्या डंपरला भीषण आग लागल्याची घटना घडली असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. दरम्यान या आगीत डंपरचे टायर जाळून खाक झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

खडकवासला-किरकटवाडी शीव रस्त्याच्या कडेला किरकटवाडी गावच्या हद्दीत गार्डनसाठी लागणाऱ्या मातीचा ढीग आहे. डंपरने माती आणून याठिकाणी ढीग लावला जातो मागणीनुसार या मातीची विक्री केली जाते. संबंधित व्यावसायिकाने मोठा मातीचा ढंपर भरुन आणला होता व तो खाली करण्याचे काम सुरू होते.

अचानक मोठ्या प्रमाणात धूर दिसू लागल्याने चालकाने खाली उतरून पाहिले असता डिझेलच्या टाकीसह टायरला आग लागल्याचे दिसले. तातडीने याबाबत पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आल्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय तांबे,अतुल रोकडे,महेश घटमाळ,पंकज माळी, विशाल घोडे, सूरज माने,किशोर काळभोर,चेतन खमसे या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

बघ्यांची गर्दी, व्हिडिओ काढण्याची धडपड ज्या ठिकाणी ढंपरला आग लागली ते ठिकाण लोकवस्तीच्या जवळ असल्याने व अग्निशमन दलाची दोन वाहने घाईत आल्याने काही मिनिटांतच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. यातील अनेक जण आपला जीव धोक्यात घालून आगीच्या जवळ जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com