
कवठे येमाई : पुढे चाललेल्या ट्रकवर मागून येणारा दूधाचा टॅंकर आदळल्याने टॅंकरच्या पुढील भागात बसलेल्या एकाच कुटूंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. कवठे येमाई (ता. शिरूर) गावच्या हद्दीत काळुबाईनगर येथे रविवारी (ता. १७) पहाटे अष्टविनायक महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात ट्रक व टॅंकरचालकासह काहीजण जखमी झाले.