जनतेप्रती उत्तरदायित्व हेच खऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे लक्षण - सुशीलकुमार शिंदे

संवाद संस्थेच्यावतीने सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी वसंतराव मसके यांचा कृतज्ञता सन्मान
true administrative officer Vasantrao Maske Sushilkumar Shinde pune
true administrative officer Vasantrao Maske Sushilkumar Shinde punesakal

पुणे : प्रशासनात काम करताना मिळालेल्या अधिकाराचा वापर हा जनतेप्रती उत्तरदायित्व निभावण्यासाठी किती करतो, हे अधिक महत्त्वाचे असते. जनतेप्रती उत्तरदायित्व हेच खऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे लक्षण असते. हेच लक्षण निवृत्त प्रशासकीय अधिकारी वसंतराव मसके यांच्यात दिसते. त्यामुळेच त्यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या समारंभाला उपस्थित असलेल्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतून दिसत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी (ता.२०) येथे व्यक्त केले.

संवाद संस्थेच्यावतीने सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी वसंतराव मसके यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, लेखक विश्वास पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विखे-पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.अशोक विखे-पाटील, कौशल वसंतराव मसके, संवादचे सुनील महाजन, सचिन ईटकर, निकिता मोघे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘निवृत्तीच्या १३ वर्षांनंतरसुद्धा आज सभागृहात जमलेले वर्ग एकचे अधिकारी हे मसके यांनी पेरलेल्या प्रेमाचेच प्रतीक आहेत. सर्वसाधारणपणे प्रशासनात मोठ्या जागेवर बढती मिळाल्यानंतर जनतेविषयी असलेले उत्तरदायित्व गमावून बसू की काय, अशी शंका येते. खरं तर प्रशासकीय अधिकारी हे जनता आणि सरकारमधील धोरणकर्ते यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहोत आणि सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे एक माध्यम आहेत. याची जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे.’’

प्रशासनात काम करत असताना कोणत्याही कामाला नाही न म्हणता सदैव सर्वांच्या उपयोगी कसे पडता येईल, असाच दृष्टिकोन मसके यांनी कायम ठेवल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी वसंतराव मसके यांनी मनोगताद्वारे सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी गाण्यातून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. रूपा शहा, शुभ मल्होत्रा, प्रतिभा शाहू मोडक यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश ठाकूर यांनी संपादित केलेल्या वसंत वैभव या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. साहित्यिक उद्धव कानडे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com