Santosh Sinalkar
sakal
पारगाव - मरेपर्यंत मैत्री निभावणारे सर्वच असतात ! मात्र मित्राच्या मृत्यू नंतर देखील त्याचे कुटुंब सावरण्यासाठी मित्र, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, तरूण मंडळे धाऊन आले. आंबेगाव तालुक्यातील रानमळा येथील ३८ वर्षीय संतोष दीपक सिनलकर याच्या अकाली निधनानंतर अवघ्या सहा दिवसात त्याच्या कुटुंबासाठी सव्वा चार लाख रुपयांची मदत गोळा करून परिसरातील मित्र व ग्रामस्थांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.