जैन मुनी प्रवचन

जैन मुनी प्रवचन
Published on

गुणांनी व्यक्तीची खरी ओळख
: मुनीश्री प्रशांतरत्नविजयजी
धन, संपत्ती, नाव, यश आणि कीर्ती मिळाल्याने व्यक्ती महान होत नाही; तिची खरी ओळख तिच्या गुणांमुळे निर्माण होते, असे मुनीश्री प्रशांत रत्नविजयजी यांनी सांगितले. जोडभावी पेठेतील श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघात जैनाचार्य श्री रामचंद्र सूरीश्वरजी महाराज यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित त्रिदिवसीय महोत्सवात ते बोलत होते. महापुरुषांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रथम त्यांच्या गुणांबद्दल प्रेम व आदर निर्माण करावा. गुणवान गुरूंचे विचार ऐकून आनंद मानावा, त्यांचे स्मरण व गुणगान करावे. गुरूंच्या चरणांचा स्वीकार केल्याने अज्ञान दूर होते आणि आत्मा गुणांच्या प्रकाशाने उजळतो. संघर्षातही साधना टिकवून समाधीद्वारे सिद्धी मिळविणारे महापुरुष विरळ असतात. त्यामुळे व्यक्तीची महानता संपत्तीत नव्हे, तर आचरणातील गुणांत असते, असा संदेश त्यांनी दिला.
--------------------------------
समाधान हवे असल्यास हाव सोडा
: साध्वी अक्षयश्रीजी म.सा.
ईश्वराने आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी अधिक दिलेले असते; मात्र माणसाची हाव संपत नसल्याने मिळालेल्या सुखाचे समाधान त्याला अनुभवता येत नाही. त्यामुळे समाधान हवे असेल तर हाव सोडली पाहिजे, असे प्रतिपादन परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांनी केले. बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित अक्षय चातुर्मासात त्या बोलत होत्या. अहंकारामुळे नाती दुरावतात. पैसा, पद किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा अहंकार नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. जीवनातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास नवा आहे. त्यामुळे त्याकडे कृतज्ञतेने पाहावे. योग्य-अयोग्याचा विवेक जागृत ठेवून बुद्धी शुद्ध केली, तर आत्मज्ञानाचा प्रकाश अनुभवता येतो. विवेक जागृत ठेवला नाही, तर चित्त अशांत राहते, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com