Sat, June 3, 2023

पुणे : अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा प्रयत्न
Published on : 29 April 2022, 8:55 am
घोरपडी - गावातील कृष्णाई नगर येथे अल्पवयीन मुलांकडून बाईक चोरी प्रयत्न करण्यात आला. रात्री पावणे तीनच्या सुमारास दोन लहान मुलांनी रस्त्याच्या कडेला लावलेली ऍक्टिवा गाडी चोरी केली. गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्यामुळे मात्र गाडी लांब घेऊन जाता आले नाही म्हणून थोड्या अंतरावर चोरलेली गाडी सोडून निघून गेले. सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली असून त्या मुलांची ओळख पटली आहे. मुले लहान असल्यामुळे दुचाकी मालकाकडून याबाबत कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आली नाही. या मुलांकडून आतापर्यंत अशा प्रकारे विविध गुन्हे केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.