esakal | पुण्यात अघोरी प्रकार! मुलीचा फोटो लावून काळ्या जादूचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात अघोरी प्रकार! मुलीचा फोटो लावून काळ्या जादूचा प्रयत्न

पुण्यात अघोरी प्रकार! मुलीचा फोटो लावून काळ्या जादूचा प्रयत्न

sakal_logo
By
भारत पचंगे

शिक्रापूर : एक काळी प्लास्टिक पिशवी, त्यावर कोहळा, त्यावर पिन टोचून लावलेला मुलीचा फोटो आणि फोटो शेजारी लिंबू टोचून त्यावर हळदी कुंकू. वशीकरणाचा अजब काळ्या जादूचा फंडा नुकताच पाबळकरांना ( ता.शिरूर ) पाहायला मिळाला. पाबळच्या स्मशानभूमीच्या दहन स्थाना शेजारी हा प्रकार नुकताच उघडकीस आला.

पाबळच्या माळवाडी येथील एका आजीच्या दशक्रियेनिमित्त ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पाबळ ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती शेळके यांच्यासह ग्रामस्थांच्या पुढ्यातच दोन फूट अंतरावर वर भोपळा इत्यादी साहित्य दिसले. मात्र दशक्रिया होताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या नजरेत त्यांनी ही वस्तुस्थिती आणून दिली.यावेळी सर्वानाच हा प्रकार समजल्याने गोंधळ उडाला.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा - रामदास आठवले

हेही वाचा: ''पुणे महापालिकेत पुन्हा आरपीआयच! भाजपसोबत येणार सत्ता''

यावेळी अनेकांनी या प्रकारावर भाष्य केले मात्र मुलीचा फोटो लावून स्मशानात असा प्रकार घडल्याचे दिसून आल्यावर नापसंती व्यक्त करताना भीती व्यक्त केली. ''आजच्या विज्ञान युगात अजूनही अंधश्रद्धा पोसल्या जात असल्याचे वास्तव समोर आल्याची प्रतिक्रिया देताना यामागची भूमिका समजणे कठीण असल्याचे सांगून नागरिकांनी काही चुकीचे घडू नये यासाठी दक्ष राहावे तसेच या प्रकाराबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा'' अशी सूचना सरपंच मारुती शेळके यांनी नागरिकांना केली.

दरम्यान, फोटोतील मुलीचा शोध अद्याप लागलेला नसल्याची माहिती शिक्रापूर पोलीसांनी दिली.

loading image