esakal | मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा - रामदास आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas-aathvale.jpg

मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा - रामदास आठवले

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे - सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा अधिकार केंद्र सरकारला (Central Government) आहे असे सांगितले, पण या समाजाला लवकर आरक्षण द्यायचे असेल तर त्याचे अधिकार राज्याला देण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. तसेच, ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची तीन टप्प्यात वर्गवारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोंदी (Narendra Modi) यांच्याकडे करणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले (Ramadas Athwale) यांनी सांगितले. (Ramdas Athawale Said Law should changed Maratha reservation)

पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, ‘‘एम्पिरिकल डेटामध्ये अपूर्ण आहे, त्यामुळे तो देण्यात अडचणी आहेत. पण २०२१ ची जनगणना जातीनिहाय करावी, यामुळे जातिवाद वाढणार नाही. समाजात परिवर्तन आता परिवर्तन झाले असून, सर्वजण एकत्र आहेत. पंकजा मुंडे ( Pankaja Munde) या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेल्या नेत्या आहेत, केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्या नाराज असल्या तरी त्या भाजप (bjp) सोडणार नाहीत, भाजपमध्येच राहतील. पंकजा मुंडे या केंद्रीय स्तरावर काम करत आहेत, जी जबाबदारी दिलेली आहे, ती उत्तम पद्धतीने पार पाडावी, असे आठवले यांनी सांगितले.

हेही वाचा: मोठी कारवाई! अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ED कडून जप्त

पवारांना बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले जात आहे, पण विरोधकांचा उमेदवार निवडून येत नाही. आमचे खासदार, आमदार यांची संख्या जास्त आहे. पवार यांना बळीचा बकरा बनवत आहेत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे राजकारण सोडणार होते, पण उलट ते आता रोज एका नेत्याच्या भेटी घेत आहेत, असा टोला आठवले यांनी मारला.

हेही वाचा: देशमुख, परब यांच्यापाठोपाठ सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात?

शिवसेनेने भाजपसोबत यावे

महाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे, त्यांच्यात ताळमेळ नाही. नाना पटोले रोज सत्तेतील कोणावर ना कोणावर आरोप करत आहेत. त्यामळे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्‍न पूर्ण करायचे असल्यास त्यांनी भाजप व आरपीआय सोबत यावे. ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहिल्यास भविष्यात शिवसेनेचे नुकसान होणार, असे भाकीत आठवले यांनी व्यक्त केले.

loading image