पुणेकरांनो, ही लेणी आहे तुमच्या हाकेच्या अंतरावर...तिच्यात असणारी वैशिष्ठ्ये जगात कोठेही नाहीत...

सिद्धार्थ कसबे
मंगळवार, 30 जून 2020

तुळजा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेल्या आद्य लेण्यांपैकी एक असावी. ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. 

पिंपळवंडी (पुणे) : सम्राट अशोकांनी बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूंवर ८४ हजार स्तूप बांधले, लेण्या कोरल्या. भारतातील एकूण लेण्यांपैकी सर्वात जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्या पैकीच एक तुळजा लेणी आहे. ती महाराष्ट्रातील आद्य लेण्यांपैकी एक आहे. जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिम बाजूला कडेलोटाच्या पायथ्याजवळ एक टेकडी आहे. त्या टेकडीपासून जवळच सोमतवाडी (ठाकरवाडी) म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी कोरलेली आपणास पहायला मिळते.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

तुळजा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही लेणी महाराष्ट्रात कोरण्यात आलेल्या आद्य लेण्यांपैकी एक असावी. ही लेणी सम्राट अशोकांच्या काळातच कोरली गेली, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. या लेणीमध्ये असलेला स्तूप हा भारतातील अन्य कोणत्याही लेणीत पहायला मिळत नाही. या स्तूपाभोवती बारा अष्टकोनी खांब आहेत आणि वरती गोलाकार घुमट आहे. घुमट व खांबांवर सुंदर रंगकाम करण्यात आले होते. बाजूलाच बौद्ध भिक्षूंसाठी विहार, भोजनालय, सभा मंडप कोरलेले आहेत.

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

लेणीच्या छताला त्यावेळी रंगकाम केलेले होते, त्याचा गिलावा व काही रंग आजही दिसतात. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. यात उपासक स्तूपाची पुजा करताना दाखवले आहेत. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा जुन्नर येथील प्रत्येक लेणीमध्ये कोरलेले दिसते. अलीकडच्या काळात चैत्यगृहाशेजारील बौद्ध भिक्खूच्या विहारात तुळजा देवीची स्थापना करण्यात आली आहे. 
या लेणीच्या डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी थेट लेणीसमोरच पानकोदीमध्ये साठवले जाते. पुढे वर्षभर या पाण्याचा वापर होत असे. पावसाळ्यात लेणीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. लेणीमधून समोर असलेला विस्तीर्ण जुन्नर तालुका व शिवनेरी किल्ला दिसतो.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

या लेणीच्या अभ्यासासाठी देश विदेशातील अनेक अभ्यासक येत असतात. लेणी आणि शिल्प कलेचे अभ्यासक महेंद्र शेगावकर सर या लेणी बद्दल सांगतात की, या लेणीच्या निर्मितीचा काळ हा सुरवातीचा म्हणजे इ.स.पू. २३० चा आहे. त्यानंतर तिथे अजिंठ्यासारखे चित्रकलेच्या माध्यमतून जातककथा व बुद्ध चरित्रातील प्रसंग साकारण्यात आली. तुळजा लेणी स्तूप व त्यावर असलेले गोल छत्र व बारा गोलाकार स्तंभ अशी रचना अन्यत्र कुठेही आढळून येत नाही. आपण शिवनेरी किल्ला बघण्यासाठी कधी जुन्नरला आलात, तर जवळच असलेल्या या ऐतिहासिक तुळजा बुद्ध लेणीला अवश्य भेट द्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

अज्ञानामुळे पुसलाय मोठा ऐतिहासिक ठेवा
तुळजा लेणीची प्रसिद्धी सन १९१८ मध्ये हेन्री कुझेन या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या कानावर गेली. त्यानंतर तो न मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर या लेणी पाहण्यासाठी येणार होते, असा निरोप जून्नरच्या तत्कालीन कलेक्टरला मिळाला. गव्हर्नर येतात म्हणून लेणीची साफसफाई करून घेण्यात आली. वाढलेली झुडपे, कोळी किष्टके, पाकोळ्याची घाण काढण्यात आली. पाणी टाकून गोणपाट- कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली. 
जेव्हा गव्हर्नर, हेन्री कुझेन आले...बघतात तर काय ? तो हा प्रकार...जे पाहण्यासाठी ते आले, तेच नष्ट झालेले होते. अतिउत्साह व अज्ञाना पायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता. झालेल्या प्रकारामुळे त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. याबाबतचा तेव्हाचा अहवाल आजही पुरातत्व खात्याकडे आहे.अज्ञाना पायी असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Tulja Cave in Junnar taluka has a history of two and a half thousand years