
पुणे : ‘देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील दहा वर्षांत अडीच ते तीन लाख कोटी रुपयांचे भुयारी मार्ग प्रकल्प उभारण्यात येतील,’ अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.