पुणेकरांनो, तुम्ही खाता त्या डाळी कुठून येतात माहिती आहे का?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

-तुर, चणा डाळीच्या दरात ५०० ते ८०० रूपयांनी वाढ
-आवक कमी असल्याचा परिणाम

मार्केट यार्ड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाउन होते. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात डाळींची खरेदी आहे. तसेच बाजारात पावसामुळे आवाक घटली आहे. यामुळे मागील दहा ते पंधरा दिवसांत घाऊक बाजारात तुर डाळ ५०० ते ७०० रुपयांनी तर चणा डाळीच्या क्विंटल दरात ७०० ते ८०० रूपयांनी वाढ झाली आहे. नविन उत्पादन येण्यास अजून अवधी आहे. त्यामुळे  डाळींच्या दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या पावसामुळे चणा आणि तुर डाळीची आवक खूपच कमी आहे. आगाऊ खरेदी केलेल्या डाळींची सध्या विक्री सुरू आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे चणा आणि तुर डाळीचे दर वाढत आहेत. इतर सर्व डाळींची आवक आणि त्यांचे दर मागील पांढर दिवसांच्या तुलनेत स्थिर आहेत असल्याची माहिती मार्केट यार्डातील भुसार बाजारातील डाळींचे व्यापारी जितेंद्र नहार यांनी दिली.

भुसार बाजारात सध्या चणा आणि तुर डाळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. तर, इतर डाळींची दररोज साधारण १५० ते २०० टन इतकी आवक होत आहे. कोरोनामुळे सध्या खानावळी, मेस, हॉटेल, विविध समारंभ आदी सर्वच व्यावसायांवर मर्यादा आल्या असल्या तरी  डाळींचा व्यापार पुर्वपदावर येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घाऊक आणि किरकोळ बाजारातील डाळींचे दर
डाळी घाऊक बाजार (क्ंिवटलचे दर) किरकोळ बाजार (एक किलोचे दर)

 
- सध्याचे दर
तुर - ८४००-९३०० - ९८- १०० रूपये
चणा - ६१००-६६०० - ६५ -७० रूपये

- पंधरा दिवस अगोदरील दर
तुर - ७९००-८५०० - ८५- ९५ रूपये
चणा - ५३००-५८०० - ६० -६५ रूपये

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येथून येतात डाळी- मार्केट यार्डात चना डाळ महाराष्ट्रातील लातूर, अकोला भागातील परिसरातून येते. तर तुर डाळ ही विदर्भातील अकोला, वाशिम यासह लातूर, उदगीर, बार्शी या भागातून मोठ्या प्रमाणात बाजार येते.

(Edited by : Sagar diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tur, Chana pulses increase in price by Rs.500