
पुणे मार्केट यार्ड : भारत- पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थितीत जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिला आहे. तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात १० किलो सफरचंदामागे २०० ते ३०० रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो २० ते ३० रुपये दराने वाढ झाली आहे.