esakal | बांधकाम क्षेत्रातील उलाढाल आली रुळावर
sakal

बोलून बातमी शोधा

Society

लॉकडाउनमुळे स्थिरावलेली बांधकाम क्षेत्रातील उलाढाल आता पूर्वपातळीवर पोचली आहे. गेल्या वर्षी जुलै ते डिसेंबर दरम्यान ४४ हजार ७०९ घरांची विक्री झाली आहे. तर याच काळात २०१९ मध्ये ४५ हजार ११० घरे विकली गेली आहेत.

बांधकाम क्षेत्रातील उलाढाल आली रुळावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनमुळे स्थिरावलेली बांधकाम क्षेत्रातील उलाढाल आता पूर्वपातळीवर पोचली आहे. गेल्या वर्षी जुलै ते डिसेंबर दरम्यान ४४ हजार ७०९ घरांची विक्री झाली आहे. तर याच काळात २०१९ मध्ये ४५ हजार ११० घरे विकली गेली आहेत.

‘गेरा डेव्हलपमेंट्‌स’ या रिअल इस्टेट कंपनीने आपला द्विवार्षिक अहवाल ‘गेरा पुणे रेसिडेंशियल रिअल्टी रिपोर्ट’ नुकताच जाहीर केला. त्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. २०२० मधील एकूण विक्री २०१९ च्या तुलनेत १२.३४ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. मुख्यत्वे वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विक्री कमी होती. दुसऱ्या सहामाहीत त्यात सुधारणा झाल्याचे दिसते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठशेपेक्षा जास्त चौरस फुटांच्या सदनिका विक्रीवर अत्यंत कमी प्रभाव पडला आहे. १२०० ते १४०० चौरस फुटांच्या क्षेत्रात २४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल ‘गेरा डेव्हलपमेंट’ने केलेल्या प्राथमिक व स्वमालकीच्या प्रकल्पांतील सर्वेक्षणावर आधारित आहे. त्यात शहराच्या मध्यभागापासून ३० किलो मीटरच्या अंतरात असलेल्या सर्व प्रकल्पांचा समावेश आहे.

नव्या कोरोना स्ट्रेनवर इतर लसीही ठरतील उपयुक्त; डॉ. गुप्ते यांची माहिती

हीच आहे नामी संधी
गेल्या नऊ वर्षांतील परिस्थिती पाहता सध्या घर घेणे परवडणारे आहे. १ हजार चौरस फुटांचे घर घेण्यासाठी ३.६८ पट वेतनाची गरज आहे. जून २०२० मध्ये ही आकडेवारी ३.७९ होती आणि डिसेंबरमध्ये ती पुन्हा ३.६८ झाली आहे. यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांना लहान विकसकांऐवजी मोठ्या विकसकांकडे जाणे फायदेशीर ठरणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पुण्यासह राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आता MSRDCकडे! 

सर्वेक्षणातील निष्कर्ष 

  • घरांच्या किमती सरासरी ३.५ टक्‍क्‍यांनी वाढल्या 
  • टक्केवारीच्या बाबतीत इन्व्हेंटरी मागील सहा वर्षांत सर्वांत कमी 
  • पाच वर्षांच्या तुलनेत प्रकल्पांची संख्या १५ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे 
  • प्रीमियम प्लस आणि लक्‍झरी घरे असलेल्या प्रकल्पांच्या संख्येत वाढ  
  • नवीन प्रकल्पांमध्ये तीन बेडरूम्स असलेली घरे महागली 

गेल्या वर्षातील पहिली सहामाही निवासी बांधकाम क्षेत्रासाठी खूप कठीण होती. २०२० च्या दुसऱ्या सहामाहीतील विक्री जवळपास २०१९ च्या प्रमाणाइतकीच झाल्याचे दिसून आले. काही कालावधीनंतर बाजारात वाढत्या इन्व्हेंटरी येत असल्यामुळे किमतीत स्थैर्य येईल. 
- रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट

Edited By - Prashant Patil