नव्या कोरोना स्ट्रेनवर इतर लसीही ठरतील उपयुक्त; डॉ. गुप्ते यांची माहिती

Corona_Pfizer
Corona_Pfizer

पुणे : ब्रिटनमध्ये उदयाला आलेल्या कोरोना विषाणूंच्या स्ट्रेनसाठी फायझरची लस प्रभावी ठरत असल्याचे अमेरिकेतील संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ज्या अर्थी कोरोना विषाणूच अणकुचीदार भाग असलेल्या स्पाईक प्रथिनातील या म्युटेशन (एन501वाय) साठी ही लस प्रभावी ठरत असेल, तर इतर लसीही नव्या स्ट्रेनविरूद्ध प्रभावी ठरतील, असा विश्‍वास राष्ट्रीय रोगपरिस्थितीविज्ञान संस्थेचे निवृत्त संस्थापक संचालक डॉ. मोहन गुप्ते यांनी व्यक्त केला. 

'कोरोना विरुद्धची भारताची लढाई आणि लसींचे बदलते स्वरूप' या विषयावर सकाळने डॉ. गुप्ते यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अमेरिकेतील टेक्‍सास विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाने यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे त्यांनी 15 प्रकारच्या स्पाईक प्रथिनांच्या म्युटेशनसाठी लसीची चाचणी केली आणि त्यात फायझरची लस प्रभावी ठरली.

डॉ. गुप्ते यांनी स्पाईक प्रोटीनचे म्युटेशनचा प्रथिनाधारीत फायझरची लस सामना करत असेल, तर इतरही लसी त्यासाठी प्रभावी ठरतील. मात्र, इतर लसींसदर्भात ठोसपणे काही म्हणण्यासाठी आपल्याला अधिकच्या संशोधनाची आणि त्यावर आधारित डेटाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सुरवातीच्या तुलनेत कोरोना रूग्णसंख्येचा दर आता 'बेस लाइन' जवळ आला आहे. पुढील काही महिने तरी यासंबंधी आपल्याला काळजी घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले. 

म्युटेशन आणि लसी :
- टेक्‍सास विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लस दिलेल्या नागरिकांच्या रक्ताची चाचणी केली. 
- थेट नव्या स्ट्रेनचा विश्‍लेषण ऐवजी त्याच्या परिणामकारकतेकडे लक्ष दिले गेले. 
- सुमारे 15 नव्या म्युटेशनसाठी फायझर आणि बायोएनटेकची लस प्रभावी 
- ब्रिटनच्या स्ट्रेनचा प्रसार अमेरिका, आफ्रिका आणि भारतात प्रथमदर्शनी वेगवेगळा दिसतोय. 
- प्रत्येक लसीच्या वैद्यकीय चाचण्यांनतरच खात्रिशीरपणे नव्या स्ट्रेनबद्दल ठोस काही म्हणता येईल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com