esakal | बारामतीतील विद्यार्थ्यांचे मोठे यश, बारावीचा निकाल 94 टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

इयत्ता बारावीच्या परीक्षेत बारामती केंद्राचा निकाल तब्बल 93.98 टक्के लागला. यंदा या परीक्षेसाठी बारामती केंद्रातून 7457 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 7008 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 3749 मुलांपैकी 3365, तर 3708 मुलींपैकी 3643 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

बारामतीतील विद्यार्थ्यांचे मोठे यश, बारावीचा निकाल 94 टक्के

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : इयत्ता बारावीच्या परीक्षेत बारामती केंद्राचा निकाल तब्बल 93.98 टक्के लागला. यंदा या परीक्षेसाठी बारामती केंद्रातून 7457 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 7008 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 3749 मुलांपैकी 3365, तर 3708 मुलींपैकी 3643 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

असा चेक करा बारावीचा रिझल्ट

महाविद्यालयनिहाय निकाल पुढीलप्रमाणे- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती- 91.64, एम. एस. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर- 87.74, आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती- 99.37, श्री शहाजी कनिष्ठ महाविद्यालय सुपे- 100, श्री छत्रपती शाहू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय बारामती- 94.84, न्यू ज्युनिअर कॉलेज, वडगाव निंबाळकर 85, म.ए.सो. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बारामती- 83.33, शारदाबाई पवार विद्यालय, शिवनगर 99.45, श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव- 88.77, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी- 84.61, नवमहाराष्ट्र विद्यालय, पणदरे 96.41, शारदाबाई पवार महाविद्यालय शारदानगर- 99.57, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सांगवी- 72.72, आनंद विद्यालय होळ- 71.87, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती- 93.58, सोमेश्र्वर विद्यालय सोमेश्वरनगर- 100, उत्कर्ष विद्यालय वाघळवाडी- 97.14, श्रीमंत शंभूसिंग महाराज महाविद्यालय माळेगाव- 71.79, कृषी उद्योग शिक्षणसंस्था काऱ्हाटी- 100, एस. व्ही. एम. व कनिष्ठ महाविद्यालय भिकोबानगर पणदरे- 100, सदगुरु शिक्षण मंडळ लोणी भापकर- 69.71, शारदाबाई पवार विद्या निकेतन शारदानगर- 100, श्री सिध्देश्वर कनिष्ठ महाविद्यालय कोऱ्हाळे- 96.82, श्री सिध्देश्वर हायस्कूल कोऱ्हाळे बुद्रुक- 100, जिजाबा गावडे विद्यालय पारवडी- 100, म.ए.सो. उच्च माध्यमिक शाळा 96.87, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल 100, धो. आ. सातव कारभारी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा- 100, अभिनव इंटरनॅशनल स्कूल- 100, शारदानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल- 100, एसपीसीटीएस कनिष्ठ महाविद्यालय- 100.

आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला

व्होकेशनल- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय- 86.95, मु. सा. काकडे महाविद्यालय- 83.01, आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल- 92.85, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय सुपे- 98.55, शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगर- 100, न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय वाणेवाडी- 63.15, नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे- 100, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर- 85.71.

Edited By : Nilesh J shende